HELPLINE NUMBERS
Helpline - 100 / Women Helpline - 1091 / Children Helpline - 1098 / Whatsapp - +91 9168551100

Police Sakhi
पोलीस सखी

आजच्या युगात समाजात तसेच समाजातील विविध घटकात स्त्रियांचा महत्वाचा सहभाग दिसून येत आहे. सध्याचे काळामध्ये विकसित झालेल्या साधनांमुळे स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण व प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या साधनांमुळे गुन्हेगारांना कोणताही प्रदेश, राज्य अथवा देशाच्या सिमेचे बंधन राहिलेले नाही. त्यामुळे पोलिसांसमोर आव्हाने वाढली आहेत.

समाजातील स्त्रियांच्या सहभागाशिवाय पोलिसाना आपले काम करणे शक्य नाही, यामुळे स्त्रिया या देखील पोलिसांचे मित्र तयार झाल्याशिवाय त्यांच्या समस्यांपर्यंत पोलीस पोहचू शकणार नाहीत. कारण पोलीस या यंत्रणेविषयी लोकांच्या मनातील दुरावा कमी करण्यासाठी पोलीस मित्राची फार मदत होते. म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत ‘पोलीस सखी’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

पोलिसांचे सर्व कार्य हे जनतेशी, समाजातील प्रत्येक घटकाशी संबंधित आहे व त्या प्रत्येक घटकात स्त्री हा देखील महत्वाचाच घटक आहे. त्यामुळे पोलीस-जनता यामध्ये परस्पर विश्वास व सहकार्य या दोन गोष्टींची नितांत गरज आहे. समाजातील प्रत्येक स्त्रीला पोलिसांकडे जेंव्हा मदतीची गरज असते तेंव्हा ती मदत सहजरीत्या पोहचली पाहिजे आणि पोलिसांकडून तात्काळ मदत मिळाली पाहिजे. महिलांवर विनयभंग, छेडछाड, कौटुंबिक हिंसाचार या प्रकारचे गुन्हे दैनंदिन होत असतात. तथापि, समाजातील स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत वाचा फोडण्यासाठी त्यांना एका व्यासपीठाची आवश्यकता आहे. यामध्ये आवश्यक असणारा बदल ‘पोलीस सखी’ या संकल्पनेवर साकारला जावू शकतो.

नाशिक ग्रामीण जिल्ह्यात पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस सखी ही संकल्पना राबविण्यास सुरुवात झाली असून त्यामध्ये पुढील मुद्द्यांचा समावेश आहे.  

 • १) ‘पोलीस सखी’ या अभियानात प्रत्येक गावातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, युवती, महिला प्राचार्य, वकील, डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हापरिषद सदस्य, एनजीओ, तसेच बचत गट अशा समाजातील विविध स्तरातील महिलांचा सहभाग आवश्यक आहे. सदर संकल्पनेत सर्व जाती-धर्मातील महिलांचा समावेश असणे आवश्यक आहे. त्यामुळे सदरची संकल्पना राबविताना जो हेतू आहे, तो साध्य होण्यास मदत होईल.
 • २) महिन्यातून एकदा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस सखींच्या बैठकीच्या आयोजनाद्वारे सखींच्या अडचणी प्राधान्याने सोडविणे.
 • ३) त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवर तात्काळ कारवाई करणे.
 • ४) विशेष मोहीम घेऊन महिलांविषयी सर्व कायद्यांविषयी जागृती करणे.
 • ५) गाव भेटीचे वेळी त्यांचेशी चर्चा करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे.
 • ६) पोलीस दलातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात त्यांचे सहकार्य घेऊन त्यांना सहभागी करून घेणे.

Contact Details

 • Phone :- 0253 - 2200495, 2200498, 2200499
 • Fax :- 0253 2309718
 • sp.nashik.r@mahapolice.gov.in
 • lcb.pol.nr@mahapolice.gov.in
 • SP Office, Police Head Quarter, Adgaon, Nashik - 422003