विवाह्पुर्व समुपदेशन केंद्र
                     महिला सुरक्षा विभाग ,पोलीस अधीक्षक कार्यालय , नाशिक ग्रामीण ,आडगांव
                    नाशिक ई-मेल pilcbnskr@gmail.com दुरध्वनी क्रमांक -०२५३-२३०३०४१

विवाह म्हणजे विवाह नसुन त्या माध्यमातुन दोन कुटुंब एकमेकांशी जुळली जातात, अशी अनेक कुटुंब एकत्र जोडली जातात. मुलांमुलीमधील विविध कारणांमुळे असलेला अहंकार,विवाह झाल्यानंतर येणारी सामाजिक व आर्थीक जबाबदारी , अपत्य झाल्यानंतर वाढणाऱ्या जबाबदाऱ्या ,एकमेंकाबद्दल असणारे समज त्याबाबत कुटुंबात मोकळेपणाने चर्चा करून समस्या सोडविण्याचा अभाव यामुळे मतभेद निर्माण होऊन संबध घटस्फोटापर्यंत जावुन एकत्र आलेल्या दोन्ही कुटूंबाचे कौटूंबिक जीवन उध्वस्त होते . यातून कुटूंबव्यवस्था धोक्यात आली आहे . विवाह इच्छुक युवक युवतींना प्रबोधन , मार्गदर्शन करणाऱ्या केंद्राची कमतरता आहे .वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणींवर मार्ग शोधता यावा व त्यासंदर्भात मार्गदर्शन मिळावे , या उद्देशाने नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे महिला सुरक्षा विभागा अंतर्गत विवाह इच्छुक युवक युवतीचे तज्ञांकडून विवाहपूर्व मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आले आहे . नाशिक जिल्ह्यातील विवाह इच्छुक युवक युवतींनी या संकेत स्थळावरील खालील अर्ज ऑनलाईन भरून नोंदणी करावी .२५ /३० अर्ज नोंदणी झाल्यावर विवाह इच्छुक युवक युवती यांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याबाबत ठिकाण व दिनांक / वेळ अर्जदारास नंतर कळविण्यात येईल . याचा जास्तीत जास्त युवक युवतींनी लाभ घ्यावा असे अवाहन करण्यात येत आहे .
APPLICATION fORM